प्रभाग २३ व २४ मधील कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर प्रश्नावर भविष्यमुखी व कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी अर्थसंकल्प २०२६–२७ मध्ये स्वतंत्र निधीची मागणी
उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगरी, मोर्वा, राई, मुर्धा तसेच परिसरातील अनेक ठिकाणी आजही रस्त्यांच्या कडेला नियमितपणे कचऱ्याचे ढीग साचत आहेत. यामुळे दुर्गंधी, आरोग्याचा धोका, पर्यावरणीय समस्या आणि नागरिकांना होणारा त्रास वाढत आहे.
तात्पुरत्या स्वरूपातील कचरा उचलण्याऐवजी आता शास्त्रीय, नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन कचरा व्यवस्थापन प्रणाली आवश्यक आहे.
त्यासाठी मागण्या:
🔹 कायमस्वरूपी कचरा कंटेनर/संकलन केंद्रे
🔹 आधुनिक कचरा संकलन वाहने व यंत्रसामग्री
🔹 ओला–सुका कचरा वर्गीकरणाची सुविधा
🔹 दाट लोकवस्तीच्या भागांसाठी Micro Planning
🔹 पुढील ५–१० वर्षांचा दीर्घकालीन कचरा व्यवस्थापन आराखडा
कचरा व्यवस्थापन हा केवळ स्वच्छतेचा विषय नाही; तो नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि शहराच्या भविष्यासोबत जोडलेला प्रश्न आहे.



Comments
Post a Comment