प्रभाग २४ मध्ये घरगुती पाइपलाईन गॅस सुविधेसाठी मागणी

प्रभाग क्रमांक २४ मधील उत्तन, पाली, चौक, तारोडी व डोंगरी परिसरातील नागरिकांना आजही घरगुती गॅस सिलेंडरवर अवलंबून राहावे लागत आहे. वाढते नागरीकरण, सुरक्षितता आणि नागरिकांची सोय लक्षात घेता घरगुती पाइपलाईन गॅस (PNG) सुविधा ही आता आवश्यक मूलभूत सुविधा आहे. यासाठी आगामी महानगरपालिका अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करून प्रभाग २४ मध्ये PNG पाइपलाईनचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी मा. आयुक्त व मा. महापौर यांच्याकडे केली आहे. 🔹 उत्तन 🔹 पाली 🔹 चौक 🔹 तारोडी 🔹 डोंगरी प्रभाग २४ मध्ये आधुनिक नागरी सुविधा पोहोचविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.

Comments