प्रभाग क्रमांक २४ अंतर्गत उत्तन–पाली किनारी गावातील अंतर्गत रस्ते व गटार व्यवस्थेच्या सुधारणा व अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत.
प्रभाग क्रमांक २४ मधील भाटेबंदर ते पालीबंदर परिसरातील अरुंद पादचारी रस्ते स्थानिक नागरिक, मच्छीमार बांधव, होड्या, जाळी व मासळी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मात्र, अनेक ठिकाणी गटारांची अयोग्य रचना, अपुरी क्षमता व देखभालीअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे उत्तन–पाली गावातील अंतर्गत पादचारी रस्त्यांचे CC काँक्रीटीकरण तसेच नियोजनबद्ध व सक्षम गटार व्यवस्था विकसित करण्याची मागणी मी मा. आयुक्त व मा. महापौर यांच्याकडे केली आहे.
तसेच, या कामांसाठी महानगरपालिका अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे.
उत्तन–पालीच्या पारंपरिक कोळीवाड्याला आवश्यक मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहील.



Comments
Post a Comment