अग्निशमन विभागाच्या कामकाजाबाबत भेटीची विनंती.

मिरा भाईंदर महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी विनंती केली आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील उत्तन, पाली, चौक, तारोडी व डोंगरी परिसरातील अग्निसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील आवश्यक उपाययोजना याबाबत चर्चा करण्याचा मानस आहे. अग्निशमन विभागाच्या अनुभवातून आवश्यक मार्गदर्शन घेऊन प्रभागातील अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी पुढील उपाययोजनांवर काम करण्याचा प्रयत्न राहील. 🚒 आपत्ती येण्याची वाट पाहण्यापेक्षा, सुरक्षिततेची तयारी आधीपासून असणे आवश्यक आहे.

Comments