करईपाडा येथील खोदलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी

प्रभाग क्रमांक २४ मधील करईपाडा येथे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या केबल टाकण्याच्या कामासाठी खोदलेला रस्ता काम पूर्ण होऊनही अद्याप पूर्ववत करण्यात आलेला नाही. यामुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येत्या काळातील धार्मिक कार्यक्रम व मिरवणुका लक्षात घेता परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मा. आयुक्तांकडे मागणी केली आहे की: 🔹 संबंधित कंपनीमार्फत रस्त्याची तातडीने व दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करून घ्यावी. 🔹 केवळ तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी व गुणवत्तापूर्ण पुनर्बांधणी करावी. 🔹 नागरिकांशी गैरवर्तनाच्या तक्रारींची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही.

Comments