प्रभाग २४ मध्ये "NO HORN / SILENCE ZONE" लागू करण्याची मागणी

प्रभाग क्रमांक २४ साठी महत्त्वाची मागणी! आज मा. आयुक्त व मा. महापौर यांच्याकडे प्रभाग क्रमांक २४ (उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगरी) परिसरातील शाळा, रुग्णालये, चर्च, मंदिरे व मशिदी यांच्या आसपास "NO HORN / SILENCE ZONE" प्रभावीपणे लागू करण्यासाठी निवेदन सादर केले. मुख्य मागण्या: ✅ संवेदनशील ठिकाणांचे सर्वेक्षण ✅ स्पष्ट व ठळक "NO HORN / SILENCE ZONE" फलक ✅ नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई ✅ ध्वनीप्रदूषणाबाबत जनजागृती विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक व भाविकांना शांत व सुरक्षित वातावरण मिळावे, हीच या मागणीमागील भूमिका. #Ward24 #Uttan #Pali #Chowk #Tarodi #Dongri #NoHornZone #SilenceZone #NoisePollution #MiraBhayandar

Comments