काम झाले, पण योग्य झाले का? — वेलंकन्नी तीर्थक्षेत्रा मागील पायऱ्यांबाबत तक्रार

उत्तन येथील वेलंकन्नी तीर्थमंदिराच्या मागील बाजूस नव्याने बांधण्यात आलेल्या पायऱ्यांची रचना विसंगत, असमतोल व सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात तात्काळ प्रत्यक्ष पाहणी, तांत्रिक तपासणी करून आवश्यक असल्यास पायऱ्यांची सुरक्षित, सुबक व नैसर्गिक उताराशी सुसंगत पुनर्बांधणी करण्याची मागणी मी मा. आयुक्तांकडे केली आहे. उत्तनचा विकास केवळ काम पूर्ण करण्यापुरता नाही; तो सुरक्षित, दर्जेदार आणि सौंदर्यपूर्ण असला पाहिजे!

Comments