प्रभाग २४ : धावगीतील ५ सार्वजनिक शौचालयांच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली

धावगी परिसरातील ५ सार्वजनिक शौचालयांची अत्यंत दयनीय अवस्था निदर्शनास आली. तुटलेल्या फरशा, खराब शौचासन, बंद नळ, अकार्यक्षम ड्रेनेज तसेच सेप्टिक टँकांच्या अपुऱ्या देखभालीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येची तातडीने स्थळ पाहणी करून सर्व शौचालयांची दुरुस्ती व आवश्यक देखभाल युद्धपातळीवर करण्याची मागणी मी मा. आयुक्तांकडे केली आहे. सार्वजनिक स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य याबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही.

Comments