उत्तन भोतोडी बंदर समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी तातडीची मागणी

उत्तन भोतोडी बंदर परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व घनकचरा साचल्याबाबत नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. उत्तनचा समुद्रकिनारा हा स्थानिक मच्छीमार, नागरिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता ही केवळ सौंदर्याचा विषय नसून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे संबंधित विभागामार्फत: 🔹 तातडीने विशेष समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम 🔹 साचलेला प्लास्टिक व घनकचरा हटविणे 🔹 नियमित साफसफाई व कचरा उचल व्यवस्था 🔹 भविष्यात कचरा साचू नये यासाठी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय राबविण्याची मागणी केली आहे. 🌊 स्वच्छ समुद्रकिनारा — निरोगी उत्तन — सुरक्षित पर्यावरण!

Comments