शिरे रोड येथील जलसाठा टाकी व अद्ययावत पंप हाऊससाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्याबाबत.
प्रभाग क्रमांक २४ मधील उत्तन शिरे रोड परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या पंप हाऊसवर अवलंबून आहे. मात्र, परिसरातील वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता सध्याची व्यवस्था अपुरी ठरत आहे.
यासाठी नवीन जलसाठा टाकी उभारणे आणि विद्यमान पंप हाऊसचे अद्ययावतीकरण करून आधुनिक पंप हाऊस विकसित करणे, अशी मागणी मा. आयुक्त व मा. महापौर यांच्याकडे केली आहे.
तसेच, दोन्ही कामांसाठी महानगरपालिका अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे.
💧 उत्तनला नियमित, पुरेसा आणि सक्षम पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहील.



Comments
Post a Comment