उत्तन–पाली किनारी गावातील अंतर्गत रस्ते व गटार व्यवस्थेच्या सर्वांगीण सुधारणेसाठी निवेदन
मा. आयुक्त व मा. महापौर यांच्याकडे प्रभाग क्रमांक २४ अंतर्गत उत्तन–पाली किनारी गावातील भाटेबंदर ते पालीबंदर परिसरातील अंतर्गत पादचारी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण (CC Roads) तसेच नियोजनबद्ध गटार व्यवस्था विकसित करण्याबाबत निवेदन सादर केले.
या कामासाठी आगामी महानगरपालिका अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे.
स्थानिक कोळी बांधव, नागरिक आणि किनारी गावांच्या गरजा लक्षात घेऊन सुरक्षित, स्वच्छ व टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.
#Ward24 #Uttan #Pali #Bhatebandar #Palibandar #CoastalVillage #CCRoad #Drainage #MiraBhayandar



Comments
Post a Comment