उत्तनच्या पाली–नवी व मोठागाव खाडीच्या सर्वंकष स्वच्छता व कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी अर्थसंकल्पीय निधीची मागणी

प्रभाग क्रमांक २४ मधील पाली–नवी खाडी व मोठागाव खाडी या दोन्ही खाड्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सखोल गाळ उपसा व शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता झालेली नसल्याने गाळ, कचरा, तिवरांची वाढ, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्या गंभीर झाल्या आहेत. हा प्रश्न केवळ स्वच्छतेचा नसून नागरिकांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि सुरक्षिततेचा आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका अर्थसंकल्प २०२६–२७ मध्ये स्वतंत्र निधीची तरतूद करून खालील कामे करण्याची मागणी केली आहे: 🔹 संपूर्ण खाड्यांचे Deep Desilting 🔹 आवश्यक ठिकाणी Retaining Wall 🔹 पाणी निचऱ्यासाठी Pumping Station 🔹 नियमित देखभाल व O&M Plan 🔹 रोगप्रतिबंधक उपाययोजनांसाठी संबंधित विभागांचा समन्वय तात्पुरती डागडुजी नव्हे, तर उत्तनच्या खाड्यांसाठी कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाययोजना आवश्यक आहेत. 🌿 स्वच्छ खाडी — सुरक्षित पर्यावरण — निरोगी उत्तन!

Comments