वेलंकन्नी श्राइनच्या समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा रस्ता — मंजुरीशिवाय काम सुरू आहे का?

भाटेबंदर–उत्तन येथील वेलंकन्नी श्राइन परिसरातून समुद्रकिनाऱ्याकडे सुरू असलेल्या सी.सी. रस्त्याच्या कामाबाबत मी मा. आयुक्तांकडे तातडीने तक्रार केली आहे. सदर रस्ता डी.पी.मध्ये प्रस्तावित आहे का? आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आहेत का? तसेच CRZ व पर्यावरणीय नियमांचे पालन झाले आहे का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंजुरीविना काम होत असल्यास ते तात्काळ थांबवून संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. विकास हवा, पण नियमांच्या चौकटीत आणि पर्यावरणाचे संरक्षण करत!

Comments